… तेव्हा मला आत्महत्या करावी वाटत होती – पाकिस्तानी कोच 

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेसोबतचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर मला आत्महत्या करावी वाटत होती, असे त्यांनी सांगितले. भारताविरुद्ध सामन्यानंतर माध्यमे आणि सोशल माध्यमांवरील लोकांच्या प्रतिक्रियांमुळे अतीव दुःख झाले होते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मिकी आर्थर म्हणाले कि, भारताकडून झालेल्या पराभवानंतर संपूर्ण संघ दुःखात होता. भारतासोबत सामन्यानंतर आमचा संघ थकला होता. खेळाडू माध्यमे आणि लोकांच्या टीकेमुळे मानसिक तणावात होता. दक्षिण आफ्रिकेवर विजय प्राप्त करून आम्ही काही वेळासाठी लोकांचे तोंड बंद केले आहे. या विजयानंतर संघामध्ये जोश पुन्हा आला आहे. पाकिस्तानी संघात जगातील सर्वश्रेष्ठ संघाना हरवण्याची ताकद आहे, असा विश्वासही आर्थर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज महत्त्वाच्या सामन्यात सपशेल नांगी टाकतात याचाच प्रत्यय दाखवित त्यांनी पाकिस्तानविरुद्ध निर्णायक लढतीत धावांनी पराभव ओढवून घेतला. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले तर पाकिस्तानने या विजयामुळे उपांत्य फेरीसाठी आपले आव्हान राखले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.