नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यावर सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. ‘हे भाजपा सरकार गॅरेज मेकॅनिकची आठवण करून देते. ज्याने आपल्या ग्राहकाला सांगितले की, मी आपले ब्रेक ठीक करू शकत नाही, म्हणून मी हॉर्नचा आवाज वाढवून दिला’. अशा मार्मिक शब्दांत ट्वीट करत थरूर यांनी अर्थसंकल्पावर बोचरी टीका केली आहे.
This BJP government reminds me of the garage mechanic who told his client, “I couldn’t fix your brakes, so I made your horn louder.” #Budget2021
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 1, 2021