मुंबई : जगाला भेडसावणाऱ्या कोरोनाने सर्वत्र तांडव सुरु केला आणि त्यातच आता कोरोनाच्या नव्या प्रकाराने तर पुन्हा एकदा जगाला धडकी भरली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना सुरुवातीला ‘गो कोरोना, कोरोना गो’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता आता ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू आढळून आल्यानंतर रामदास आठवले यांनी नवीन कोरोना विषाणू विरोधात ‘नो कोरोना, कोरोना नो,’अशी घोषणा दिली आहे.
रामदास आठवले यांनी कोरोना विरोधात दिलेला ‘गो कोरोना, कोरोना गो’ चा नारा देशभरात प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे त्यानंतर आठवले यांच्या घोषणेवर आधारित अनेक गाणीदेखील तयार करण्यात आली होती.
Earlier I gave the slogan 'Go Corona, Corona Go' and now corona is going. For the new coronavirus strain, I give the slogan of 'No Corona, Corona No': Union Minister Ramdas Athawale pic.twitter.com/ND2RQA7gAY
— ANI (@ANI) December 27, 2020
आपल्या मजेशीर शैलीत कविता करणारे मंत्री रामदास आठवले देशभरात प्रसिद्ध आहेत. देशभरातून तसेच जगभरातून कोरोना निघून जावा, यासाठी आठवले यांनी गो कोरोना, कोरोना गो च्या घोषणा दिल्या होत्या. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रामदास आठवले ‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा देताना दिसले होते.
या नव्या विषाणूशी लढण्यासाठी आता रामदास आठवले यांनी ‘नो कोरोना, कोरोना नो,’ अशी घोषणा दिली आहे. त्यामुळे पूर्वीच्या घोषणेप्रमाणे आठवले यांची ही घोषणादेखील सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात आठवले यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. मात्र, त्यानंतर आठवले यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.