मला या “बिनधास्त’ संघाचा अभिमान – रवी शास्त्री

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. प्रत्येक संकटाला मात देत कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकावर असण्यासाठी आपली टीम पात्र आहे, असे शास्त्रींनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक अपडेटनंतरही भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. या क्रमवारीमुळे शास्त्री खूष आहेत.

शास्त्री यांनी आपल्या संघासाठी एक ट्‌विट केले. ते म्हणाले, संघाने प्रथम क्रमांकाचा मुकुट मिळविण्यासाठी दृढनिश्‍चय आणि एकाग्रतेचे उत्तम उदाहरण सादर केले. ही अशी एक गोष्ट आहे जी खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीमुळे मिळविली आहे.

मध्ये काही नियम बदलले परंतु भारतीय संघाने आपल्या मार्गावरील प्रत्येक अडथळा दूर केला. माझे खेळाडू कठीण काळात कठोर क्रिकेट खेळले. मला या बिनधास्त संघाचा फार अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रवी शास्त्री 2017पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. वर्ल्ड कप 2019नंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाल वाढविण्यात आला. एकूण 121 रेटिंग गुणांसह भारत कसोटीत अव्वल स्थानी आहे. भारताने 24 सामन्यात 2914 गुण मिळवले. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये भारताविरुद्ध खेळणाऱ्या न्यूझीलंडचे 120 रेटिंग गुण आहेत. त्यांचे 18 कसोटी सामन्यात एकूण 2166 गुण आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.