मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. आज नवनीत राणा आणि रवी राणा यांची यांची कारागृहातून सुटका झाली. राणा दाम्पत्य मागील 12 दिवसांपासून कारागृहात होतं. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना प्रकृती खालावल्याने लिलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
दरम्यान आधी नवनीत राणा यांची कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर कारागृहातून सुटलेल्या रवी राणा यांनी नवनीत राणा यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी पती रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा आश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने धरला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी या कृतीमुळे न्यायालयाने देखील फटकारलं होतं. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला.