नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असनी हे चक्रीवादळ सध्या आंध्र प्रदेशातील काकीनाडापासून सुमारे 300 किमी आग्नेय दिशेने पसरले असून मंगळवार ते नंतर हळूहळू कमकुवत होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ मंगळवारी रात्रीपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ सरकण्याची शक्यता होती आणि नंतर उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यावर समांतर सरकण्यासाठी पुन्हा वक्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
तथापि सोमवारी ताशी 25 किमी वेगाने पुढे जाणारे चक्रीवादळ बऱ्यापैकी मंद झाले होते आणि गेल्या सहा तासांत ते 5 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले होते. पहाटे 5:30 वाजता ते काकीनाडापासून 300 किमी अंतरावर होते.
भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाच्या गतीवर बारकाईने लक्ष ठेवले असून त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत 20 राष्ट्रीय बुलेटिन जारी केली आहेत, स्थानिक प्रशासनाला वादळाबद्दल अद्ययावत माहिती यामुळे मिळत गेली आहे.
दरम्यान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सोमवारी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.