म्हासुर्णेत आजही जपली जातेय शेकडो वर्षांची परंपरा

प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात रंगतोय महाआरती सोहळा

म्हासुर्णे – म्हासुर्णे (ता. खटाव) येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली श्रावण महिन्यात समई तेवत ठेण्याची परंपरा आजही भक्ती भावाने जोपासली जात आहे. यंदाही 61 समई श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून तेवत ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणारे तेल भाविक मंदिराचे पुजारी यांच्याकडे सुपूर्त करतात. त्यानंतर अखंड दिवस रात्र या समई तेवत ठेवण्यासाठी पुजारी काळजी घेतात. या काळात मंदिरात दररोज आध्यात्मिक कार्यक्रम सुरु असतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाआरतीचे आयोजन गावातील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येते.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या आरतीला गावातील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देवुन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील व गावातील उद्योजक विनायक औंधे यांच्या हस्ते महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली. महाआरतीस प्रारंभ होण्यापूर्वी म्हासुर्णे गावच्यावतीने बाळासाहेब पाटील यांचा सत्कार सरपंच सचिन माने यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महाआरतीस सुरूवात झाली. महाआरतीला म्हासुर्णे गावातील महिला, ग्रामस्थ, युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी म्हासुर्णे गावातील माऊली मंदिर, भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिरात जावुन दर्शन घेतले व म्हासुर्णे गावातील सर्व ग्रामस्थांच्या बरोबर विविध विषयांवर चर्चा करुन ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या.

महाआरतीला सह्याद्री साखरकारखान्याचे संजय जगदाळे, संजय थोरात, म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने, शिक्षण संस्थेचे चेअरमन महादेव माने, उपसरपंच सुहास माने, सेक्रेटरी राजाराम माने,चेअरमन दादासो कदम, भैरवनाथ चेअरमन अशोक माने, प्रा. ज्ञानेश्‍वर माने, ए. आर. दबडे, पांडुरंग माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, विठ्ठल माने, गुलाब वायदंडे, गोरख माने, सोसायटी संचालक अधिक माने, शहाजी माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)