entertainment news – अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिचे दमदार व्यक्तिमत्त्व लोकांना खूप आवडते. vidya balan obesity
विद्या बालन सध्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ऑफ इंडियाची सदस्य आहे. पण विद्या बालनला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. विद्या बालनच्या वजनाबाबत लोक तिला खूप जज करतात, असे असले तरी विद्या बालन तिच्या बॉडी वेटवरून कधीही निराश झाली नाही. पण नुकतेच असे काही घडले ज्याने विद्या बालनला रडू कोसळले .vidya balan obesity
View this post on Instagram
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने तिच्या शरीराबद्दल आलेल्या कमेंट्सबद्दल सांगितले. विद्या बालनला तिच्या शरीराचा तिरस्कार नाही. लठ्ठपणाबाबत विद्याने सांगितले, ‘काही दिवसांपूर्वी ती बॉडी मसाजसाठी गेली होती आणि मालिश करणाऱ्या बाईने अचानक तिच्या लठ्ठपणावर टिप्पणी केली आणि विद्या बालनला विचारले की तिचे वजन पुन्हा वाढले आहे का? विद्याने सांगितले की या घटनेने तिला खूप अस्वस्थ केले आणि तिने महिलेला तिच्या शरीरावर टिप्पणी न करण्यास सांगितले कारण तिला ते आवडले नाही. विद्याने सांगितले की, एका मालिश करणाऱ्या बाईने तिच्या वाढलेल्या वजनावर टिप्पणी केली होती, त्यानंतर ती खूप रडली. vidya balan obesity
विद्या बालन ने पुढे सांगितले की, या घटनेमुळे तिला खूप दुःख झाले. या घटनेनंतर विद्या बालन पतीला भेटली आणि ढसाढसा रडू लागली. विद्या बालनने असेही नमूद केले की तिच्याकडे आधीच व्यस्त आठवडा होता आणि ती फक्त आराम करण्यासाठी मसाज सेंटरला गेली होती. पण त्याऐवजी तिला वाढलेल्या वजनावरून ऐकावे लागले. vidya balan obesity