शिरूरमध्ये ऑटो झोन मेळाव्याला उदंड प्रतिसाद

‘दैनिक प्रभात’तर्फे आयोजन : दुसऱ्या दिवशी मेळाव्यात ग्राहकांचा प्रचंड सहभाग

शिरूर –“दैनिक प्रभात’च्या वतीने शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर भव्य वाहन मेळावा (ऑटो झोन) आयोजित करण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यास दुसऱ्या दिवशी नागरिक, ग्राहकांनी वाहन मेळाव्यास भेट दिली. या वाहन मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मेळावा परिसर नागरिकांनी गजबजून गेला होता.

ग्रामीण भागामध्ये प्रथमच अशा प्रकारच्या विविध 14 कंपन्यांचे चारचाकी व दुचाकी वाहने एकाच छताखाली नागरिकांना पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी “दैनिक प्रभात’चे आभार मानले. “दैनिक प्रभात’ च्या वतीने शिरूर तालुक्‍यात प्रथमच हा भव्य वाहन मेळावा भरवण्यात आला आहे. त्यामुळे शिरूर शहरासह तालुक्‍यातील नागरिकांनी मेळाव्याला प्रतिसाद दिला आहे. शिरूर तालुक्‍यामध्ये प्रथमच अशाप्रकारे एकाच छताखाली 14 नामांकित कंपन्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहने आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी उस्फूर्तपणे नागरिकांनी सर्व कंपन्यांच्या वाहनांची माहिती घेतली. विविध कंपन्यांकडून ग्राहकांना माहिती देण्यात आली.

वाहन मेळाव्यात महिंद्रा कंपनीची नव्यानेच आलेली जीतो प्लस कमर्शियल गाडीची लॉन्चिंग शिरूरमधील मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे कमर्शियल आणि दररोज वापरण्यात येणारी वाहने कार, शालेय बसेस, मालवाहतूक टेम्पो, दुचाकी वाहने, हिरो कंपनीच्या विविध प्रकारची दुचाकी वाहने, रॉयल एनफिल्ड बुलेट, विविध प्रकारची वाहने, जीप कंपास, एमजी फॅक्‍टर, इनोव्हा फॉर्च्यूनर, नेक्‍सॉन, हरीहर, टाटा योद्धा, टाटा इंट्रा, फोर्ड इको स्पोर्ट, क्रेटा, सेंट्रो, बोलेरो महिंद्रा, महिंद्रा मॅरेजो, महिंद्रा एक्‍स एल व्ही, होंडा कंपनीची डब्ल्यूआरव्ही, बीआरव्ही आदी कंपन्यांची वाहने मेळाव्यात लक्षवेधी ठरली आहेत.

विविध कंपन्यांच्या वाहनांनी ग्राहकांचे लक्ष वेधले

मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिक, ग्राहकांना गाड्या, दुचाकी व चारचाकी वाहनांची माहिती विविध कंपन्यांचे एक्‍झिक्‍यूटिव्ह देत होते. गाडीचे अंतरंग आणि बाह्यरंगाची माहिती तसेच वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात येत होती.
काही गाड्यांची टेस्ट ड्राईव्हची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे वाहन खरेदीदार किंवा वाहनांची चौकशी करणाऱ्या नागरिकांनी टेस्ट ड्राईव्ह मिळाल्याने समाधान व्यक्‍त केले. रविवारी (दि.24) रोजी वाहन मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.

प्रभातमध्ये वाहन खरेदीसाठी नवे दालन
“दैनिक प्रभात’च्या वतीने भव्य वाहन मेळाव्यात (ऑटो झोन) दुसऱ्या दिवशीही ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. “प्रभात’मुळे शिरूर शहरासह तालुक्‍यातील नागरिकांना वाहन खरेदीसाठी नवे दालन प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी दिली. नामकिंत कंपन्यांमुळे दर्जेदार वाहने मेळाव्यात दाखल झाल्यामुळे यावेळी नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.