बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर दाढी करण्यापूर्वी आपल्या दाढीच्या लूकची शेवटची झलक चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्याने त्याच्या चेहऱ्याचा एक जवळचा सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कॅमेरा पाहताना दिसत आहे.
यामध्ये हृतिकची दाढी अगदी जवळून पाहिली जाऊ शकते. हा फोटो शेअर करत त्याने पोस्ट केली की, “दाढी काढण्यापूर्वी.’ हृतिकच्या या पोस्टमुळे त्याच्या काही चाहत्यांना आनंद झाला, तर काहींनी त्याला दाढी करू नका, असे आवाहनही केले आहे.
यावर एका युजरने आपली प्रतिक्रिया देत लिहिले की, “नोओओओओ.’ तसेच आणखी एकाने पोस्ट केले ही, “तुझा सेल्फी कोणत्याही फोटोशूटपेक्षा कमी नाही.’ तर एका चाहत्याने त्याचे कौतुक करत लिहिले की, “क्लोजअप ऑफ द इयर’. अभिनयाबद्दल सांगायचे झाल्यास हृतिकने फिल्म इंडस्ट्रीत नुकतीच वीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्याने “कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले असून आपल्या डान्सने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान तो अखेर सिद्धार्थ आनंदच्या “युद्ध’ या चित्रपटात झळकला होता.