हॉलीवूड गायिका कायली मिनोग म्हणाली की, तिने जेव्हा आपले पहिले नवीन गाणे “से समथिंग’ हे ऐकले तेव्हा तिला रडू कोसळले. कायली म्हणाली की, हे गाणे ऐकताच मला तात्कालिक संबंध जाणवले. हे गाणे तिच्या नवीन अल्बम “डिस्को’मधील पहिले सिंगल गाणे आहे.
हीट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कायली म्हणाली, “या वर्षाच्या सुरुवातीस जेव्हा मी हे गाणे ऐकले तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि मी रडले. मला हे आठवते की माझे डोळे भरून आले आणि मी निर्मात्यांना फोन करून सांगितले की हे गाणे खूपच छान झाले आहे. आपण जी अपेक्षा केली होती, त्यापेक्षाही ते खूप काही सांगून जात आहे.
या गाण्यातून प्रेम प्रतित होत असून प्रत्येकाला प्रेमाच्या संभाव्यतेबद्दल माहीत असते. कायली सांगते, माझ्यासाठी ते प्रेमासाठीची शाश्वत शोध असून यासाठी प्रेमसंबंध असावेच असे काही नाही. फक्त प्रेमासाठी प्रेम करा. आपण सर्व जण वेगवेगळे आहोत, परंतु आपल्या सर्वांमध्ये एक समान इच्छा किंवा गरज आवश्यक आहे आणि हे अंतहीन असते, असे कायलीने सांगितले.