Bollywood – अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचा चित्रपट फायटर बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सिनेमाची चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एक नवीन पोस्टर शेअर केले आणि हा चित्रपट कधी येतोय हे सांगितले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने आपल्या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये फायटरला 100 दिवस असे लिहिले आहे आणि कॅप्शनमध्ये – 100 दिवसांमध्ये फायटर येत आहे. फायटर जानेवारी 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्याची तयारी करत आहे.
चित्रपटाचे पोस्टर आणि रिलीजची माहिती पाहून चाहते खूप खुश दिसत आहे. एका युजर्सने लिहिले,’ते लॉन्च होण्याची प्रतीक्षा करत आहे. हे महाकाव्य आणि अविश्वसनीय असेल. तर दुसऱ्या एकाने लिहिले,’मला आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा व्यवसाय करेल. टीझर कधी येणार सर? असा प्रश्नही आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
दरम्यान ‘फायटर’च्या सेटवरील या पूर्वही अनेक फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, सिद्धार्थ आनंद, ममता आनंद आणि बॉस्को मार्टिससह अनेक लोक इटलीमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हृतिक सेल्फी घेताना दिसत आहे तर दीपिका त्याच्या शेजारी बसून पोज देत आहे. तो सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, बॉस्को मार्टिस यांच्यासोबत टेबलाभोवती बसलेला दिसला. हा फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय करण सिंग ग्रोव्हर आणि तलत अजीज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एरियल अॅक्शनवर आधारित आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार असल्याचं बोललं जात आहे.