अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरील मालिकेपासून झाली. पण नंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि भरारीही घेतली. आता लवकरच ती एका नव्या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात “क्रिश 4′ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू आहे.
दरम्यान, हृतिकने यासाठी मृणाल ठाकूरचे नाव सुचवल्याचे समजते आहे. सध्या तरी मृणालच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे दिसत आहे. “सुपर 30′ या चित्रपटात हृतिक आणि मृणालची जोडी दिसली होती आणि प्रेक्षकांनीही त्यांना चांगली पसंती दर्शवली होती.
याखेरीज मृणालने जॉन अब्राहमसोबत बाटला हाऊस हा चित्रपटही केला. सध्या ती शाहीद कपूरसोबत “जर्सी’मध्ये दिसत आहे.