आज ताज लॅन्डसच्या बैठकीत राज ठाकरे उपस्थित होते. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् एँडस येथे ही बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल.
अशात अशी माहिती समोर येत आहे की, मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी जागा मिळणार आहे. दक्षिण मुंबई येथे अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे तर, शिर्डीच्या जागेवर बाळा नांदगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे. आज लॅन्डस येथे झालेल्या बैठकीनंतर शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
हे वाचले का ? दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे यांना मिळणार खासदारकीचं तिकीट?
अशात मनसे महायुतीमध्ये आल्यास दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळणार का? असा प्रश्न वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण दरेकर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले ,’अशा प्रकारच्या अनेक चर्चा आहे, शिर्डीची जागा बाळा नांदगावकरांना दिली जाईल का? भाजपामध्ये जे पक्ष आले, त्यांना सामील करुन घेतलं, त्यांचा सन्मान केला. कुठली जागा द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतु त्यांचा सन्मान निश्चित होईल’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे वाचले का ? राज ठाकरेंची फडणवीस आणि शिंदेंसह ताज लँड्स हॉटेलमध्ये दीड तास खलबतं; काय घेणार भूमिका?