मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव कशी कराल? (भाग-१)

मागील लेखात आपण भारतभर झालेल्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक पालक आपल्या भविष्यातील आर्थिक उद्दीष्टांमध्ये मुलांचे शिक्षण या उद्दीष्टाला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षात शिक्षणासाठी लागणारा खर्च सतत वाढत जाताना दिसत आहे. येणाऱ्या काळातही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावर होणारा खर्च वाढताना दिसत आहे. दोन दशकांपूर्वी शिक्षणासाठी उपलब्ध असणारे पर्याय व आज उपलब्ध होत असलेले नवनवीन पर्यायांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. स्पेशलाईज्ड शिक्षण ही काळाची गरज असल्याने विविध क्षेत्रात नवनवीन शैक्षणिक अभ्यासक्रम तयार होत आहेत. तसेच या अभ्यासक्रमाचे शुल्क खर्चही मोठा असतो.

या सर्वांसाठी पालकांना मुलांची दहावी झाल्यावर पैशाची जमवाजमव करणे खूप अवघड होऊन बसते. या सर्वांची तयारी अगदी मूल जन्माला आल्यावरच सुरवात केली तर त्याचा फायदा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सुरवातीपासून केलेल्या गुंतवणुकीतून पैसे उभे करण्यास सहजपणे होतो. यासाठी पुढील उदाहरण निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.

पुण्यातील राकेश आणि सरीता यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा राम पाच वर्षांचा व शाम एक वर्षांचा आहे. राकेशने दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करण्याचे ठरवले आणि त्याच्या आर्थिक सल्लागाराबरोबर सल्लामसलत करून गुंतवणुकीस सुरवात केली. रामच्या जन्माच्यावेळी राकेशने म्युच्युअल फंडाच्या डायर्व्हिसिफाईड योजनेमध्ये रू. ५,००० ची मासिक एसआयपी सुरु केली. आज राम २१ वर्षांचा झाला आहे व त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे आहे.

राकेशने रामच्या नावे केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य पुढीलप्रमाणे निर्माण झाले आहे.
रू. ५००० प्रतिमाह गुणिले x १२ महिने x २१ वर्षे = १२,६०,००० रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव कशी कराल? (भाग-२)

या गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंडाच्या डायर्व्हसिफाईड फंडाने दरवर्षी १५ टक्के चक्रवाढ दराने परतावा दिला आहे. या गुंतवणुकीमधून २१ वर्षात निर्माण झालेली रक्कम रू. ८८,६३,००० आहे. म्हणजेच राकेशला या एसआयपीमध्ये
रू. ८८,६६,००० ( गुंतवणुकीचे मूल्य) – रू. १२,६०,००० (गुंतवलेली मूळ रक्कम) = रू. ७६,०६,००० (झालेला नफा)

Leave A Reply

Your email address will not be published.