मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव कशी कराल? (भाग-२)

मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव कशी कराल? (भाग-१)

रामच्या उच्च शिक्षणासाठी राकेशला अमेरिकेतील दोन वर्षांचा खर्च ९०,००,००० रुपये येणार आहे आणि रामच्या नावे केलेल्या म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमधून निर्माण झालेली रक्कम रू. ८८,६६,००० आहे. अशा रितीने आवश्यक रकमेची तयारी राकेशने यशस्वीरित्या पूर्ण केली.

राकेशचा दुसरा मुलगा शाम याच्याही उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी राकेशने एकरकमी गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाईड योजनेत केली. शामच्या जन्मतःच रु. एक लाखांची गुंतवणूक करण्याचे त्याने ठरवले. आज शाम १७ वर्षाचा झालेला आहे.

गुंतवलेली रक्कम (रू. १,००,०००) = १७ वर्षांनंतरचे गुंतवणुकीचे मूल्य रू. ४५,५२,९११ एवढे आहे.

राकेशच्या या गुंतवणुकीमध्ये शामच्या नावे गुंतवलेल्या १,००,००० चे जवळपास ४५ पट पैसे वाढवून मिळालेले आहेत. याचे कारण गुंतवणुकीस १७ वर्षे सुरुच ठेवल्याने या रकमेची वृद्धी होऊ शकली आहे.

वरील दोन्ही उदाहरणांमध्ये राकेश आणि सरीता या पालकांनी आपल्या दोन्ही मुलांच्या उच्च शिक्षणाच्या मोठ्या खर्चाची तयारी अगदी मुलाच्या जन्माच्या दिवसापासून लगेचच सुरु केल्याने आज मुले २१ व १७ वर्षाची झाल्यावर अतिशय चांगली रक्कम गुंतवणुकीतून निर्माण करता आली आहे. गेल्या वीस वर्षात ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरुच ठेवली त्यांना भारतीय शेअरबाजाराच्या सर्व चढ आणि उताराचा फायदा घेता आला आहे. यामुळेच दीर्घकालिन गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरत आलेली आहे. याची पुढील काही उदाहरणे आपल्याला पाहता येतील.

सुंदरम सिलेक्ट मिडकॅप फंड – ३० जुलै २००२ ला सुरु झालेली योजना. या दिवशी गुंतवलेल्या रू. १,००,००० चे आजचे मूल्य रू. ४५,५२,९११ एवढे झाले आहे. (१७ वर्षात या गुंतवणुकीत ४५ पट वाढ झाली आहे.)

एचडीएफसी इक्विटी फंड – १ जानेवारी १९९५ रोजी सुरु झालेली योजना. या दिवशी गुंतवलेल्या रू. १,००,००० चे आजचे मूल्य रू. ६७,६१,५४० एवढे झाले आहे. (२४ वर्षात या गुंतवणुकीत ६७ पट वाढ झाली आहे.

रिलायन्स ग्रोथ फंड – ८ ऑक्टोबर १९९५ रोजी सुरु झालेल्या या योजनेत रू. १,००,००० गुंतवले असता आज त्याचे मूल्य रू. १,१०,६०,२५९ एवढे झाले आहे. (२४ वर्षात ११० पटीने गुंतवणुकीवर परतावा मिळाला आहे.)

फ्रँकलिन प्रायमा फंड – १ डिसेंबर १९९३ रोजी सुरु झालेल्या ग्रोथ पर्यायामध्ये गुंतवलेले रू. १,००,००० आज रू. ९३,३०,२५४ एवढे झाले आहे. (२६ वर्षात गुंतवणुकीत ९३ पटीने वाढ झाली आहे.)

वरील दिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये असे लक्षात येते की, ‘मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी मोठी रक्कम उभी करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या योग्य योजनांची निवड करणे व त्यामध्ये दीर्घकालिन गुंतवणूक करणे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरते’.

अनेक पालकांच्या मनात या महत्त्वाच्या उद्दीष्टासाठी गुतंवणूक करण्याचे ठरलेले असते परंतु शेअर बाजाराचा सततचा चढउतार त्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापासून दूर नेत असतो. अशावेळी प्रत्येकाने आपल्या आर्थिक सल्लागाराकडून ‘निश्चित’ उद्दीष्टाचे नियोजन (गोल बेस्ड प्लॅनिंग) करणे अत्यंत गरजेचे आहे.

आपले उद्दीष्ट ठरवल्यानंतर त्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा व उद्दीष्टांचे ध्येय ठेवूनच गुंतवणुकीमध्ये थांबणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकवेळा पहिल्या पाच ते आठ वर्षात गुंतणुकीमध्ये मोठी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे गुंतवणूकदाराच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशावेळी योग्य सल्ला आपल्याला उद्दीष्टांपर्यंत निश्चितच घेऊन जातो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)