गुंतवणुकीवर झालेला नफा प्राप्तिकरासाठी कसा मोजाल? (भाग-1)

अनेक करदात्यांना मुख्य उत्पन्नाव्यतिरिक्त इतर मार्गांनी उत्पन्न येत असते. प्राप्तिकरासाठी वर्षाच्या अखेरीस आपल्याला किती उत्पन्न मिळाले व त्याची नेमके कसे मोजमाप करावे याचाच आज आपण परामर्श घेणार आहोत.

दरवर्षी आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर प्रत्येक करदाता आपल्या उत्पन्नाचे मोजमाप करत असतो. मुख्य उत्पन्नाव्यतिरिक्त (पगार अथवा व्यवसायातील नफा) इतर अनेक मार्गांनी उत्पन्न मिळत असते. उदा. भांडवली मालमत्तेची विक्री, जागेची विक्री, मुदत ठेवींवरील व्याज, घरभाडे इत्यादी. या सर्व प्रकारच्या इतर उत्पन्नाचे योग्य मोजदाद न केल्यास निश्‍चितच प्राप्तिकर विभागाकडून विचारणा केली जाऊ शकते. प्राप्तिकर विभाग दिवसेंदिवस योग्य उत्पन्न न दाखवणाऱ्या नागरिकांबाबत वेगवेगळ्या माध्यमातून याबाबतची माहिती मिळवत असतो. त्यातून संबंधितांना यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत.

अनेक गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकदारांना प्राप्तिकर माफ होत असतो. परंतु तरीही या उत्पन्नाची नोंद प्रत्येकाने आपल्या प्राप्तिकर विवरणात करणे आवश्‍यक आहे. उदा. बचत खात्यावर जमा होणारे रुपये दहा हजारांपर्यंतचे वार्षिक व्याज करमुक्त आहे. परंतु याची नोंद प्राप्तिकर विवरणात करणे आवश्‍यक आहे. कारण सदर व्याज हे इतर उत्पन्नात मोजले जाते. ज्या गुंतवणुकीच्या नफ्यावर प्राप्तिकर आकारला जात नाही (उदा. पीपीएफवर मिळणारे व्याज, रोख्यांच्या मुदतपूर्तीनंतर मिळालेली रक्कम इत्यादी) या उत्पन्नाचा प्राप्तिकर विवरणात (एक्‍झेम्प्ट इन्कम) उत्पन्नावर मिळणार सूट या रकान्यात नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

भांडवली गुंतवणुकीमध्ये विक्री केल्यावर झालेला नफा. उदाहरणार्थ म्युच्युअल फंड गुंतवणूक, शेअर्स, सोने, जमिन अथवा घर इत्यादी यांना भांडवली लाभ (कॅपिटल गेन) आकारला जातो. प्रत्येक गुंतवणूक प्रकाराचे वेगवेगळे नियम भांडवली लाभासाठी लागू आहेत. तसेच छोट्या काळाचा व दीर्घकाळाचा भांडवली नफा याचेही विविध नियम आहेत.
दीर्घकालीन भांडवली लाभ (लॉंग टर्म कॅपिटल गेन) शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडांसाठी कसा आकारला जातो ते पाहू या.

गुंतवणुकीवर झालेला नफा प्राप्तिकरासाठी कसा मोजाल? (भाग-2)

प्रश्‍न – जर मला रु. 1,00,000 पेक्षा कमी भांडवली लाभ झाला असल्यास प्राप्तीकर विवरणात माहिती देणे आवश्‍यक आहे का
उत्तर – जर रू. 1,00,000 पर्यंतचा भांडवली लाभ म्युच्युअल फंडाच्या विक्रीतून झाला असल्यास आयकर विवरणामध्ये याचा निश्‍चित उल्लेख करावा. यानंतर यावर मिळणार दीर्घकालीन भांडवली लाभाची सवलत आपल्याला घेता येणार आहे.
प्रश्‍न – जर दीर्घकालीन भांडवली तोटा किंवा अल्पकालीन भांडवली तोटा झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफा रू. 1,00,000 पेक्षा कमी झाल्यास मला झालेला नफा व नुकसान याची माहिती प्राप्तिकर विवरणात देणे आवश्‍यक आहे.
उत्तर – जर गुंतवणूकदाराला दीर्घकालीन भांडवली तोटा झाला असेल आणि नफ्यातून तोटा वजा केल्यानंतर दीर्घकालीन नफा रू. 1,00,000 पेक्षा कमी असेल तर त्याची नोंद आयकर विवरणात करावी. वेगळ्या मार्गाने तोटा नोंदवण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.