पुणे -जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा आदींसह इतर निवणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. अद्याप रणधुमाळी जाहीर नाही तरी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
निवडणूक रणधुमाळीला अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार दमदार बरसण्याससुरुवात झाली आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढविण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे. आगमी निवडणुकीत इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
तर, या साऱ्या वातावरणामुळे सोशल मीडियादेखील तापला आहे. जाहीर सभांचे फड प्रचार सभांच्याप्रसंगी रंगतीलच पण पूर्वतयारी म्हणून सोशल मीडियावर इच्छुकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्यास सुरू झाली आहे.
निवडणुकीची लढाई मैदानात लढली जाते, तितकीच तिची रणनीती राजकीय पक्षांच्या “वॉर रुम’मध्ये देखील तयार केली जाते. उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या नेत्यांच्या सभा, दौरे, स्टार प्रचारक, विरोधकांकडून होणारे हल्ले तत्काळ परतवून लावणे, मतदार सभा, दौरे, स्टार प्रचारक, विरोधकांकडून होणारे हल्ले तत्काळ परतवून लावणे, मतदार याद्यांपासून मीडिया ब्रिफिंगपर्यंत “सबकुछ’ या वॉररूमध्येच ठरते.
त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशअ मीडियाच हक्काचा प्रचार “स्टार’ ठरणार असल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांनी जोरदार तयारी केली असून त्याची रंगिततालिम सुरू आहे. लवकरच या ट्रेलरचे चित्रपटात रुपांतर झालेले मतदारांना दिसणार आहे.
लोकसभा 2014च्या निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी वॉर रूममधून सोशल मीडियावर फोकस केला आहे, त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षांचे वॉर रुम आता 365 दिवस दिवस-रात्र सुरुच असतात. त्यातच निवडणूक हंगामात ते अधिक जोमाने कामे करीत असतात त्यापद्धतीने सध्या सर्वच पक्षांकडून कामे सुरू आहेत.
वरिष्ठांना खुश करण्यासाठी चढाओढ
स्थानिक पातळीवरील बडे नेते आघाडी, युतीचा निर्णय घेतील पण पक्षाने आपल्याला तिकीट नाही दिले तर बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढण्याची खुणगाठ सर्वच पक्षांतील इच्छुकांनी केली आहे, त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी जवळपास पूर्णकेली आहे.
आपल्या पक्षाला जागा सुटणार की नाही, याच बरोबर आपल्याला उमेदवारीमिळण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक बड्या नेत्यांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी वाढल्या असून विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनांसाठी वरिष्ठांना आणण्यासाठी त्यांच्या तारखा आतापासूनच बुक करण्याचा सपाटा अनेकांनी लावला आहे.
स्थानिक नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष
पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर तिनही पक्षांचे एकमेकांशी पटत असून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी पक्षीय कार्यकर्ते, नेते सोडत नाही.
त्यामुळे आघाडी होण्याची शक्यता धुसरच आहे. काही ठिकाणी आघाडी, युती अशी गणिते दिसणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते तथा अजित पवार यांनी निवडणुकीत आघाडी, युतीचे निर्णय स्थानिक पातळीवरच सोडले असल्याने असले तरी सर्व पक्ष स्वबळावरच निवडणूक लढणार अशी शक्यता तर आताच निर्माण झाली आहे.
वॉररूमचे काम जोरोशोरोसे
वर्षांपूर्वी विरोधक व आपण दिलेल्या आश्वासनांचे काय झाले-कामांची आकडेवारी व गावांनुसार याद्या जवळपास तयार आश्वासनांप्रमाणे कामे का झाली नाहीत त्याची उत्तरे आणि त्यात काय अडचणी आहेत याचे मुद्देसूद पत्रके,
व्हॉट्सऍपवर टाकण्यात येणाऱ्या माहितीची जुळवाजुळव करून ठेवलेली आहे. विरोधकांनी विकासकामांत घातलेले “खो’ आगामी पाच वर्षांचे संकल्प मतदारांना आकर्षित करणारी स्लोगन, थॉटस, गाणी तयार करण्यासाठी टीम कार्यरत आहे.