पुणे -ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी औषध वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी गावातील आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका या प्रत्यक्ष घरी जात आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.
करोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक विशेषत: रक्तदाब, मधुमेह, अस्थमा या आजाराच्या व्यक्ती आणि लहान मुलांना आहे. दरम्यान, व्हिटॅमिन डी-3 हे औषध महिन्यातून दोन डोस घ्यावे. व्हिटॅमिन सी दररोज एक गोळी चघळून खावी आणि झिंक गोळी दररोज एक गोळी खाणे. ही तीनही औषधे जेवणानंतर घ्यायची असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.