भीती घालवण्यासाठीच निवडला भयपट!

हॉरर सिनेमांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. सर्वसामान्य प्रेक्षक आजही असे चित्रपट पाहात नाहीत. याचे कारण मनात उगाचच कशाला भीती निर्माण करायची, असा त्यांचा सवाल असतो. पण एखाद्या हॉररपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीलाच भयपटांची भीती वाटते असे सांगितले तर..! ऐकून आश्‍चर्य वाटेल ना; पण हे खरं आहे. विक्रम भट्ट यांच्या “घोस्ट’ या आगामी चित्रपटातील नायिकेनंच हे सांगितलं आहे.

भारतात हॉरर पटांचा विषय जेव्हाही निघतो तेव्हा विक्रम भट्ट यांचा उल्लेख होणे अपरिहार्य असते. त्यांच्या “घोस्ट’ या आगामी चित्रपटात सनाया इराणी आणि शिवम भार्गव हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील सनायाच्या अभिनयाबाबत आणि आत्मविश्‍वासाबाबत सर्वच जण तिचे कौतुक करत आहेत.

पण या सनाया मॅडमना भूताखेतांच्या हॉरर सिनेमांविषयी जबरदस्त भीती वाटते म्हणे! मग तरीही तिने या चित्रपटात काम करण्यासाठी तयारी कशी दर्शवली, असा प्रश्‍न तुम्हालाही पडला असेल ना? याबाबत सनाया म्हणते की, माझ्या मनातील ही भीती कायमची निघून जावी यासाठीच मी हॉररपटाची निवड केली.

ही निवड सार्थ ठरली असून माझ्या मनातील हॉररपटांची भीती आता बऱ्याच अंशी निघून गेली आहे, असे सनाया सांगते.

Leave A Reply

Your email address will not be published.