स्त्रीच्या आयुष्यात आई बनणं हे जसं एक स्थित्यंतर असतं, तसंच पुरुषांच्या आयुष्यातही बाप बनणं हे जबाबदारी वाढवणारं असतं. पुरुषांना तर पत्नीची आणि नंतर मुलाची काळजी घेण्यासाठी तयार राहावं लागतं. बॉलीवूडमधील कलाकार मंडळीही याला अपवाद नाहीत. कॉमेडी शोचा सम्राट कपिल शर्मा सध्या या जबाबदारीसाठी तयारी करताना दिसतोय. “द कपिल शर्मा शो’ हा त्याचा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.
यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे पत्नी गिन्नी प्रेग्नंट असल्यामुळे तिच्या देखभालीकडेही कपिलचे लक्ष आहे. आपले प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना कपिल खूप खुश आहे. साधारण डिसेंबर महिन्यामध्ये गिन्नी आणि कपिलच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. बाळंतपणानंतर कपिलला आपला जास्तीत जास्त वेळ गिन्नीसोबत घालवायचा आहे.
यासाठी तो आतापासूनच खास तयारी करत आहे. जेणेकरून त्याला आपल्या शोचे चित्रीकरण संपवता येईल. अलीकडेच कपिल आणि गिन्नी बेबीमून सेलिब्रेशनसाठी कॅनडाला गेले होते. तिथे दोघांनीही एकत्र वेळ घालवला. कपिलने आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर तेथील काही फोटो शेअर केले आहेत.