आजचे भविष्य (बुधवार, दि. ३० डिसेंबर २०२०)

मेष : हातातील कामे आधी पूर्ण करा, मगच नवीन कामांकडे वळा. घरात मदतीची आवश्‍यकता इतरांना वाटेल.

वृषभ : कामानिमित्ताने प्रवास व नवीन ओळखी होतील. घरात आनंदाचे क्षण साजरे होतील.

मिथुन : मनोकामना सफल होतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. वातावरण खेळीमेळीचे राहील.

कर्क : नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागले तरी वाच्यता करू नका. महिलांना अपेक्षित कामाचा उरक पडेल.

सिंह : सहकारी व वरिष्ठ यांची मदत आवश्‍यक तेव्हा येईल. घरात तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

कन्या : घरात नवीन खरेदीचे बेत प्रत्यक्षात साकार होतील.महिलांना मानाचे स्थान भूषवता येईल.

तूळ : तरुणांना मनःशांती मिळवताना त्रास वाटेल. एकाग्रता साधणे कठीण आहे. कामातील बेत गुप्त ठेवा.

वृश्‍चिक : महिलांचा करमणुकीच्या कार्यक्रमात वेळ जाईल. तुमच्या वागण्याचा तणाव इतरांना जाणवणार नाही.

धनु : प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने सुस्कारा टाकाल.

मकर : महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. प्रगती साधता येईल.

कुंभ : घरात तुमच्या वागण्या बोलण्यात पारदर्शकता ठेवा. कृतीवर भर देऊन कामाचा उरक पाडा.

मीन : वेळीच काम उरका. ओळखी करताना पारख करा. घरात समजुतीचा घोटाळा होत नाही याकडे लक्ष ठेवा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.