मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातला आहे. कोरोनाने सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत कुणालाही सोडलं नाही. आतापर्यंत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंबंधित माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) December 29, 2020
त्यांनी ट्विट केले आहे की,’मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी काळजी घ्यावी. सध्या माझी प्रकृती ठीक असून लवकरच ते बरे होऊन कामावर रुजू होतील.’