आजचे भविष्य (बुधवार, दि. २३ डिसेंबर २०२०)

मेष : खेळत्या भांडवलाची सोय बॅंका व हितचिंतक यांच्याकडून होईल. प्रकृतीची कुरकुर कमी होईल.

वृषभ : नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमची अडचण ओळखून कामही पूर्ण करतील.

मिथुन : प्रतिष्ठेत भर टाकणारी खरेदी कराल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

कर्क : महिलांना कामाची नवीन किरणे दिसतील. व्यवसायात धाडस करून वेगळया पद्धतीचे काम सुरू कराल.

सिंह : तरुणांना नवीन करिअर करण्याची संधी चालून येईल. महिलांना नवीन सहवासाने आकर्षण वाटेल.

कन्या : नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून वागा. सवलती मिळवण्यासाठी कारणे यथायोग्य मांडा.

तूळ : घरात तुमचा पवित्रा सावध ठेवलात तर होणारी गैरसोय कमी होईल. केलेल्या श्रमाचे कौतुक होईल.

वृश्‍चिक : मंगलकार्य ठरतील. महिलांना बराच काळ वाट बघून एखादी सुसंधी मिळाल्याने आनंद वाटेल.

धनु : मानसन्मानाचे योग येतील. घरात गृहसजावटीसाठी खरेदी होईल. प्रवासाचे बेत कुटुंबासमवेत आखाल.

मकर : कामाचे स्वरूप बदलून फायद्याचे प्रमाण वाढवण्याचा विचार असेल. प्रतिष्ठित व्यक्‍तींचा पाठिंबाही मिळेल.

कुंभ : घरात सर्वांचे मनःस्वास्थ्य सांभाळावे लागेल. तरुणांना मनसोक्‍त बिनधास्त वागता येईल.

मीन : घरात मंगलकार्याची नांदी होईल. तरुणांचे विवाह जमतील. महिलांना मानसिक शांतता मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.