मेष : मानले तर समाधान मिळेल. सबुरीचे धोरण ठेवा.
वृषभ : मनोबल चांगले राहील. कौटुंबिक स्वास्थ मिळेल.
मिथुन : नवीन करार करण्यास योग्य ग्रहमान.
कर्क : जमा खर्च समसमान राहील. हाती शिल्लक राहणार नाही.
सिंह : हितचिंतक व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या.
कन्या : स्वभावाला औषध नाही. इतरांशी व्यवस्थित संभाषण करावे.
तूळ : नोकरीत कामाच्या स्वरुपात तात्पुरते बदल होतील.
वृश्चिक : आशा निराशेचा खेळ दाखवणारे ग्रहमान आहे.
धनु : एखादी चांगली गोष्ट मनात आली, तर लगेच कृतीत आणा.
मकर : सतत कार्यमग्न राहून, प्रगती करण्यावर भर राहील.
कुंभ : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कामाला लागा.
मीन : मनोधैर्य वाढेल, प्रोत्साहन मिळेल.