मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. सुसंगती लाभेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातील कामास दिवस अनुकूल आहेत.
वृषभ : उत्साही रहाल. तुमची उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. अंदाज अचूक ठरतील.
मिथुन : प्रवास टाळा. मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याकडे काळजीने बघावे. तक्रारींवर वेळीच उपाय करावेत.
कर्क : मनोबल उंचावण्यावर भर द्यावा. कार्यसिद्धीस अनुकूलता वाढेल. हितचिंतक मदत करतील.
सिंह : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. संततीच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. गृहसौख्य लाभेल. पैशाची चिंता मिटेल.
कन्या : कामाचे कौतुक होईल. सार्वजनिक कामात पुढाकार राहील. इतरांवर छाप पाडाल. प्रवास सुखकर होईल.
तूळ : आवडत्या व्यक्तींची भेट होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. कार्यक्षेत्र रुंदावेल. कर्तव्यदक्ष रहाल.
वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे मिळतील. नवीन अनुभव येतील.
धनु : पैशाची तजवीज होईल. कामात मनस्ताप होईल. रागांवर नियंत्रण ठेवावे. मनोबल कमी राहील.
मकर : प्रवास शक्यतो टाळा. मनोरंजनावर भर राहील.कमी श्रमात जास्त यश. योग्य मार्गदर्शन मिळेल.
कुंभ : अपेक्षित कामात प्रगती होईल. योग्य दिशा मिळेल. मनोकामना पूर्ण होतील.
मीन : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. सहकारी कामात मदत करतील. अध्यात्मिक प्रगती होईल.