कात्रज – भाजपप्रणित केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदा आणला आहे. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असून यात देशाचेही नुकसान आहे, त्यामुळे हा कायदा लवकर रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा नगरसेवक प्रकाश कदम यांनी केली.
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरामध्ये प्रकाश कदम यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम, प्रणव कदम, राहुल काळे, सुधीर डावखर, विजू पवार, शिवाजी शेंडगे, संजय खोपडे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.