आजचे भविष्य (गुरुवार, दि. ७ जानेवारी २०२१)

मेष : तुमच्या कामाची जिद्द दांडगी राहील. व्यवसायात कामात अडथळे आल्याने काही बदल करावा लागेल.

वृषभ : फार मोठी उडी न घेता जमिनीवर पाय रोवून उभे राहा. व्यवसायात एक प्रकारचा तणाव जाणवेल.

मिथुन : घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. बॅंक व कर्जे घेऊन कामे कराल.

कर्क : भावनाप्रधान तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे मानसिकता जपा. घरात कामात वेळ जाईल.

सिंह : व्यवसायात अडथळे. अडचणींवर मात करता आल्याने हायसे वाटेल. केलेल्या प्रयत्नांचे चीज होईल.

कन्या : प्रकाशाचा किरण दिसल्याने तुमचा आशावाद जागृत होईल. तुम्ही कामात सजग व्हाल.

तूळ : कळतं पण वळत नाही, अशी स्थिती तुमची झाली असेल. तेव्हा ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

वृश्‍चिक : व्यवहारात मधेच निराशेचे झटके येतील. कामातील अडचणींमुळे वैतागाल. तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका.

धनु : अपेक्षित पैसे मिळण्यास विलंब होण्याची शक्‍यता आहे. शुल्लक कारणावरून वादाचे प्रसंग येतील.

मकर : नोकरीत तुम्हाला योग्य वाटेल त्याच पद्धतीने कामं करा. इतरांच्या कामात लक्ष न घालणे चांगले.

कुंभ : कामातील बेत गुप्त ठेवा. मनं शांत ठेवलेत तर त्यातून मार्ग निघेल. खर्चावर बंधन ठेवणे गरजेचे आहे.

मीन : अध्यात्मिक प्रगतीसाठी थोडा वेळ द्या. व्यवसायात भरपूर कामं करून भरपूर पैसे मिळवता येतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.