मॉलमार्ट, दैनिक प्रभात व सुहाना मसाले यांचा संयुक्त उपक्रम
आळंदी – येथील मॉलमार्ट, दैनिक प्रभात व सुहाना मसाले यांच्या संयुक्त विद्यमाने 73व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाची सेवा करणाऱ्या आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच पोलिसांचा सन्मान मॉल मार्टच्या भव्य प्रांगणात करण्यात आला.
यावेळी आजी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांना सन्मानचिन्ह व रोपे देऊन यथोचित असा त्यांचा सन्मान करण्यात आला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीनुसार मॉलमार्टला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस विविध प्रकारचे एक रोपटे भेट म्हणून देण्यात आले. त्याचबरोबर सर्वांचे सेल्फी घेऊन वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी आळंदी देवाची पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, त्यांचे सर्व सहकारी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच मॉल मार्ट खरेदी कूपन, सुहाना मसाले गिफ्ट पॅक, एक झाड भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी मॉलमार्टचे संचालक संतोष थोरात, दिलीप ठाकूर, दैनिक प्रभातचे पत्रकार एम. डी. पाखरे, सुहाना मसाल्याचे हिंगे, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, मच्छिंद्र शेंडे, कवी ज्ञा. ग. चौधरी, भगवान साखरे व मॉलमार्टचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.