हॉंगकॉंगमधील प्रसिद्धी माध्यम प्रमुखास अटक

हॉंगकॉंग – लोकशाहीवादी आवाज उठवणाऱ्या जिमी लाई या प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातील प्रस्थापित संस्थेवर चीनने निर्बंध घातले आहेत. लाई यांच्या प्रसिद्धी माध्यम संस्थेच्या मुख्यालयावरही चीनने छापा घातला आहे. वादग्रस्त राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली लाय यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. विदेशी शक्तींबरोबर संगनमत केल्याच्या संशयावरून त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे, असे मार्क सिमोन यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून सात जणांना अटक करण्यात आली आहे, असे हॉंगकॉंग पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु अटक केलेल्यांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत. 

लाई हे”ऍपल डेली’ या लोकप्रिय टॅबलॉइडचे मालक आणि हॉंगकॉंगमधील एक प्रस्थापित लोकशाही समर्थकही आहेत. त्यांच्या नियतकालिकामधून चीनच्या एकधिकारशाही विरोधात नियमित टीका केली जात असते. लाई आणि त्यांच्या मुलाच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. तसेच त्यांनी सुरू केलेल्या “नेक्‍स्ट मिडीया’ या माध्यम समुहाशी संबंधित अन्य सदस्यांच्याही घरांचीही झडती घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.