अफगाणिस्तान आणि तालिबानवर आधारित ‘हे’ हॉलिवूड चित्रपट आवर्जून पाहायला हवेत!

सध्या सर्वत्र अफगाणिस्तान आणि तालिबान या दोनच विषयांवर सर्वत्र चर्चा सुरू आहे. आगामी काळात अफगाणिस्तानचे भवितव्य अंधकारमय झाले आहे असे दिसते. या देशात घडलेल्या तालिबानी कारवायांवर काही चित्रपटदेखील आले होते. 

हे चित्रपट सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन आणि कथेच्या बाबतीत उत्तमच ठरले ज्यामुळे या चित्रपटांना रिलीज झाल्यानंतर बरेच यश मिळाले. या चित्रपटांना देशात आणि जगातही खूप पसंती मिळाली. चला तर मग, अफगाणिस्तान आणि तालिबानवर आधारित सर्वोत्तम चित्रपटांबद्दल जाणून घेऊया –

१२ स्ट्रॉंग 

९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रमुख तळांवर कसा हल्ला केला हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला त्यात मायकेल शॅनन आणि मायकेल पेन देखील पाहायला मिळतील. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

लोन सर्वाइव्हर 

2013 साली सेट केलेला हा चित्रपट जून 2005 मधील एका घटनेचे चित्रण करतो, जिथे एक अमेरिकन सैन्य दल कुख्यात तालिबान नेता अहमद शाहला पकडण्यासाठी गेले होते. पुढे काय होते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. या चित्रपटात मार्क वाहलबर्ग मुख्य भूमिकेत आहे.

द आउटपोस्ट 

हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर अनेक तालिबानी दहशतवादी अचानक हल्ला करतात. या दरम्यान, यूएस लष्कराची एक छोटी टीम अनेक तालिबानी दहशतवाद्यांशी लढते. पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा.

झिरो डार्क थर्टी 

2012 साली आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या तपासापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतची कथा सांगतो.

रेस्ट्रेपो 

टीम हेथरिंग्टन दिग्दर्शित हा डॉक्युमेंटरी चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला. अफगाण युद्धाच्या वेळी एका अमेरिकन सैनिकाचा युद्ध अनुभव चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आला आहे. अमेरिकेने जशी चूक व्हिएतनाममध्ये केली होती तशीच अफगाणिस्तानमध्येही करत आहे हे डॉक्युमेंट्रीने दाखवले आहे.

रॅम्बो

हा चित्रपट आपल्याला अफगाणिस्तानची जुनी कथा दाखवतो, जेव्हा सोव्हिएत युनियनने तेथे आक्रमण केले. चित्रपटात, नायक एका मिशनवर निघाला आहे जिथे त्याला सोव्हिएत सैन्यापासून त्याच्या मित्राची सुटका करायची आहे. पुढे काय होते? त्याला जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

द डिक्टेटर 

या चित्रपटात तुम्हाला भरपूर विनोद पाहायला मिळतील. चित्रपटात अलादीन, जो एक हुकूमशहा बनला आहे, अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. त्याच वेळी, तो एका गुप्त आण्विक मोहिमेवरही काम करत आहे ज्याचा हेतू इस्रायलवर हल्ला करणे आहे. हे सर्व घडताना पाहून संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद या प्रकरणी हस्तक्षेप करते आणि अलादीनला यूएन मुख्यालयात संबोधित करण्यासाठी बोलावले जाते. पुढे काय होते? त्याला जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.