पुणे – दोन दिवसांपूर्वीच इंधनावरील करात कोणतीही सुट देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हटके शुभेच्छा देत टोलाही लगावला.
सध्या देशात इंधन दरवाढी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सगळीच महागाई वाढली असून सर्वसामान्यांची अवस्ता बिकट झाली आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अर्थमंत्री सीतारामण यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून त्यांच्यावर निशाणाही साधला.
देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्रीजी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं.
देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री @nsitharaman जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना! pic.twitter.com/OD0uzicic8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2021
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात इंधनावर दिलेल्या अतिरिक्त अनुदानामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काही काळ पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करणे शक्य नाही असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतचं दिलं होतं.