मुंबई – राज्यभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अश्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवास्थानी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील संपूर्ण जतनेला होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. या संदर्भातील एक ट्विट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
“होळी पौर्णिमेनिमित्त वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या होलीकोत्सवात सहभागी होत मनोभावे पूजन केले. जळणाऱ्या अग्नी सोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली. राज्यातील सर्व नागरिकांना होलिकोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा.!’ अश्या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.