टाकळी हाजी – जिल्हा परिषद शाळा मुजावरवस्ती (ता. शिरूर) येथे बाल आनंदी बाजार व व्यसनमुक्ती होळी पेटविण्यात आली.
शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचे कौशल्य, देवाण-घेवाण, व्यवहार ज्ञान, मिळावे यासाठी आनंदी बाजार आयोजन केले असल्याचे मुख्याधापिका शोभा घोडे यांनी सांगितले. विद्यार्थांनी आपले शेतातून भाजीपाला, फळे-विक्रीसाठी आणली होती. या बाजारात वीस हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याचे घोडे यांनी सांगितले.
तसेच व्यसनमुक्ती होळी पेटवण्यात आली. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब दाते, उपाध्यक्ष जनार्धन भोरडे, नामदेव दाते, दत्तात्रय पडवळ, नितीन दंडवते, राघू दाते, सोनाली येवले उपस्थित होते. मुख्याध्यापिका शोभा घोडे व शिक्षिका पुष्पा वाळुंज यांनी नियोजन केले होते.