डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा
पुणे – सुपर इलेव्हन, राजा बंगला स्पोर्टस् क्लब आणि इनकम टॅक्स् संघ, पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल ऍकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत सुपर इलेव्हन संघाने विक्रम पिल्ले ऍकॅडमी ब संघाचा 5-2 असा सहज पराभव केला. राजा बंगला स्पोर्टस् क्लब संघाने किडस् इलेव्हन संघाचा 7-0 असा धुव्वा उडवित सनसनाटी सुरूवात केली. विजयी संघाकडून फ्रॅन्को सुब्रमण्यम याने तीन तर, करोन कात्रज, ओंकार सोनावणे, नीरज जगताप व रोहन राठोड यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
इनकम टॅक्स्, पुणे संघाने हॉकी लव्हर्स संघावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल ऍकॅडमीचे अध्यक्ष विजयेन्द्र गायकवाड आणि विरेन्द्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर निकालः
सुपर इलेव्हनः 5 (आकाश सपकाळ 3, 49 मि., रमाकांत बी., 7, 55 मि., साकीब इनामदार 58 मि.) वि.वि. विक्रम पिल्ले ऍकॅडमी बः 2 (रितेश पवार 40, 54 मि.); हाफ टाईमः 0:
राजा बंगला स्पोर्टस् क्लबः 7 (फ्रॅन्को सुब्रमण्यम 2, 17, 35 मि., करोन कात्रज 4 मि., ओंकार सोनावणे 8 मि., नीरज जगताप 20, रोहन राठोड 29 मि.) वि.वि. किडस् इलेव्हनः 0; हाफ टाईमः 2-0;
इनकम टॅक्स् संघ, पुणेः 5 (आशुतोष 2 मि., अर्थव 6, 19 मि.; आशिष शेट्टी 10 मि., विक्रम 18 मि.) वि.वि. हॉकी लव्हर्सः 0; हाफ टाईमः 5-0;