‘खिलाडी’ अक्षयवर ‘हिरकणी’ पडली भारी
मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ हा हिंदी चित्रपट सुद्धा रिलीज झाला आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे कधी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बघायला जातोय अशी भावना अनेकांची होती.
दरम्यान, ‘हिरकणी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली की तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली आहे. हिरकणी चित्रपट प्रदर्शित होताच संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी आणि मंगळवारी १५० पेक्षा जास्त शोज हाऊसफुल असून, एका दिवसात ६० पेक्षा जास्त शोज वाढले. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात मराठी चित्रपट हिंदीवर भारी पडल्याचे चित्रपट दिसून आले आहे.
View this post on Instagram