हिंगोली – येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मंदिरातील दानपेट्या उघडून त्यातील रक्कमेची तीन दिवस मोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ लाख रुपये निघाले आहेत. विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर दानपेट्यांतील रक्कम मागील ३ दिवसा पासून मोजण्यात आली आहे. सर्व दानपेट्या मधील रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे.
एकूण रक्कम ४८ लाख ३८ हजार ५०० रुपये इतकी रक्कम गणपती चरणा दान म्हणून जमा झाली आहे. यापूर्वी दानपेटीतील रक्कम दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी मोजण्यात आली होती. सर्व रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आली आहे.
चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हजारो भाविक येतात. अनंत चतुर्दशीला होणाऱ्या मोदकोत्सवाला तर ५० हजारांवर भाविक येथे दर्शनासाठी येतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे भाविकांना येथे येता आले नव्हते.
गणपती बाप्पाची प्रतिस्थापना येत्या चार दिवसात होणार आहे. त्यामुळे चिंतामणी गणपतीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या काळात भाविकांना दान करता यावे, यासाठी दानपेट्याही रिकाम्या केल्या आहेत. दानपेटीतील सर्व रक्कम मोजण्यासाठी विश्वस्त मंडळ, भाविक आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले. (Hingoli: Donation of 45 lakhs by devotees at the feet of Vighnaharta Chintamani)