मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’ सध्या आपल्या आगामी “अतरंगी रे’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सारा अनेक ठिकाणी जाणून आपल्या सिनेमाला प्रमोट करत आहे. ‘अतरंगी रे’ सिनेमात दाक्षिणात्य सुपर स्टार ‘धनुष’ आणि अभिनेता ‘अक्षय कुमार’ देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
तसेच, या सिनेमात सारा अली खान ही डबल रोल मध्ये असणार आहे. या दोन्ही हिरोंबरोबर भिन्न कालखंडामध्ये सारा रोमान्स करताना दिसणार आहे. सारा बिहारमधील मुलगी असेल, तर धनुष दक्षिणेकडील असेल. क्रॉस कल्चर्ड लव्ह स्टोरी अशी या सिनेमाची थीम असणार आहे. अक्षय कुमारबरोबरची लव्ह स्टोरी एका वेगळ्याच युगातील कहाणी असणार आहे.
सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच साराचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, सारा टीकेची धनी ठरली आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोत सारा महादेवाची पूजा करताना दिसते. साराचे हे सगळे फोटो शेअर करत ‘अतरंगी रे’ या आगामी सिनेमाच्या प्रदर्शना आधी सारा दिल्लीत महादेवाची पूजा करते असे कॅप्शन देण्यात आले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर सारा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.