कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणार हिना खान

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान ही मे महिन्यात होणा-या कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर वॅक करण्यास तयार झाली आहे. याप्रसंगी ती आपल्या डेब्यू “लाइंस’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदिर्शत करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हुसैन खान यांनी केले आहे.

एका मुलाखतीत हिना म्हणाली, मी चित्रपटाची चाहती असूनही गेल्या काही वर्षांपासून बिझी शेड्यूलमुळे कोणत्याची चित्रपट महोत्सवात सहभागी होवू शकली नाही. पण आता मला वाटते की, ही वेळ योग्य आहे. मी माझ्या पहिला चित्रपट घेवून या महोत्सवात तो सादर करू, असे हिनाने सांगितले. मला आशा आहे की मी असाच प्रकारे कान्स महोत्सवात आपला प्रॉजेक्‍ट्‌स सादर करीत राहीन. कारण हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यातून तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्थरावरील अटेंशन मिळते.

आपल्या डेब्यू चित्रपटाबाबत हिना म्हणाली, ही एक साधी, पण मनाला स्पर्श करणारी कथा आहे. अनेकजण असे आहेत की जे विनाकरण दुस-यांच्या भांडणात पडतात आणि त्याचे परिणाम हे त्याच्या कुटुंबियांना भोगावे लागतात. या चित्रपटात दाखविण्यात आलेली नाजियाची (हिना खान) कथा ही प्रत्येक घरातील एका मुलीची आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.