पोलिस स्थानकावर हल्ला करणारे तीन दहशतवादी अटकेत

श्रीनगर- शुक्रवारी चनप्पोरा येथील पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मद संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली. मुश्‍ताक, जुनैद आणि लतिफ अशी या तिन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत आणि हे तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे श्रीनगरचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक हसीब मुघल यांनी सांगितले. हल्ल्याच्यावेळी या दहशतवाद्यांनी पोलिसांची रायफल हिसकावून नेण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता.

या हल्ल्याचे डिजीटल पुरावे आणि गोपनीय सूत्रांकडील माहिती मिळवून पोलिसांनी तपास केला. या संदर्भात काही संशयित पोलिसांच्या रडारवर होते. त्यांना उचलून चौकशी केली असता त्यांच्यापैकी एकाने गुन्हा कबूल केला आणि आपल्या गटाची माहिती दिली, असे मुघल यांनी सांगितले.

शुक्रवारी पासपोर्ट पडताळणीच्या निमित्ताने एक दहशतवादी पोलिस स्थानकात घुसला. त्यानंतर अन्य दोघांनी आत घुसून पोलिसांकडील रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी गोळीबार केल्यावर हे दहशतवादी पळून गेले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.