चंबा (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशातील चंबा सीमा भागात झालेल्या एका अपघातात राखीव बटालियनचे सहा जवान आणि एक नागरीक असे एकूण सात जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
ठार झालेले जवान दुसऱ्या भारतीय राखीव बटालियनचे आहेत. चंबा जिल्ह्यातील बैरगढ-तिसा रस्त्यावर हा अपघात झाला आणि हे जवान ज्या वाहनातून प्रवास करीत होते त्यांचे वाहन दरीत कोसळून ही दुर्घटना घडली. चंद्रू राम नावाच्या एका स्थानिक रहिवाशाचाही अपघातात जीव गेला आहे.
निवेदनानुसार, राकेश गोरा, एचसी प्रवीण टंडन, सीटी कमलजीत, सीटी सचिन, सीटी अभिषेक, सीटी लक्ष्य कुमार अशी मृत पोलीस जवानांची नावे आहेत.या दुर्घटनेत एक स्थानिक रहिवासी आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.