मैत्री, प्रेम, शारीरिक संबंध; बार गायिका बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने दिला अटकपूर्व जामीन

पुणे – बार गायिकेने केलेल्या बलात्काराच्या आरोप प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एकाला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. दोघेही सज्ञान आहेत. जून 2019 ते ऑगस्ट 2020 या एक वर्षाहून अधिक कालावधीमध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध होते.

त्यानंतर विलंबाने सप्टेंबर 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कोठडी घेऊन चौकशी करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा आदेश दिला आहे.

शिवा अमरनाथ दुबे असे अटकपूर्व झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. जैद कुरेशी यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. एप्रिल 2019 मध्ये सबंधीत 23 वर्षीय तरूणी मित्राच्या मदतीने नोकरीच्या शोधात मुंबईला आली होती. तिला इंटरनेट डान्स बारमध्ये गायिका म्हणून नोकरी मिळाली. तेथे दुबे ग्राहक म्हणून जात असत. दोघात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.

दोघे एकमेकांच्या संपर्कात राहु लागले. जून 2019 मध्ये लग्नाचे अमिषाने त्याने तिच्याशी संबंध ठेवले. मात्र, त्याने तिच्या बारमध्ये काम करण्यास आक्षेप घेतला. त्यानंतर संबंध बिघडत गेल्यावर तिने फिर्याद दिली. त्यानुसार हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात जैद कुरेशी यांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजुर केला. पोलीस बोलावतील, त्यावेळी तपासास हजर राहणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, या अटींवर हा आदेश देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.