कोल्हापूर – पदवीधर निवडणुकीच्या मतदानावर आक्षेप घेणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था ड्रॉनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा जे. पी. नड्डा यांच्यासमोर करताना त्यांना नाकीनऊ आले असेल.
जेथे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तिथे भाजपा नेस्तनाबूत झाला. त्यामुळे भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा भाजपाला अधिकार काय आहे? ज्या तात्विक मनुवाद्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहले, त्याचे पुस्तक जाळून टाका. तुमचे मनुवादी आदर्श तपासून घ्या? मगच नामांतराचा विषय घ्या असंही सावंत म्हणाले आहेत.