मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची अजून सुद्धा खूप चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. या सिनेमात बॉलिवूडचे अनके बडे कलाकार दिसून आले आहेत.
अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव, पृथ्वीराज सरनाईक आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या तगड्या कलाकारांची फौज सिनेमात पाहायला मिळाली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी द काश्मीर फाइल्स सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहिती नुसार, अनुपम खेर यांनी नुकतंच एका अत्यंत गरीब कश्मिरी पंडित कुटुंबाला दत्तक घेतलं आहे. या कुटुंबातील अशोक कुमार रैना, त्यांची पत्नी आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे कुटुंब दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जादरू गावात रहातात. इतकंच नाही तर त्यांनी त्या कुटुंबातील मुलीच्या लग्नाचा खर्चही उचलला आहे. सध्या सर्वच स्तरातून अनुपम खेर यांच्या या कामाचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे.