Asaduddin Owaisi : हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले. इस्रायलने दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच युद्धाची घोषणा केली आणि गाझा पट्टीवर हल्ला केला. हे युद्ध इस्रायल लवकरच जिंकेल, असे मानले जात आहे. मात्र आता या युद्धात इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने मतमतांतरे तयार होत आहेत. काही देशांनी इस्रायलला तर काहींनी उघडपणे पॅलेस्टाईनला साथ दिली असल्याचे दिसून येत आहे. त्यात भारताने इस्रायलच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी देशातील काही नेत्यांनी पॅलेस्टाईनला आपला पाठिंबा दिला असल्याचे समोर आले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची जगभरात चर्चा होत आहे. अनेक देश इस्रायलला पाठिंबा देत आहेत तर अनेक देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. त्याच पार्श्ववभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी “गाझाचे हात, पॅलेस्टाईन जिंदाबाद.” असे म्हणत पॅलेस्टाईनला समर्थन दिले आहे.
Hands of GAZA,Falasteen Zindabad.
Violence Murdabaad (done mainly by Israel or any Group/organisation )
Masjid e Aqsa Aabad Rahe pic.twitter.com/7RKgE1bqe9
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 11, 2023
अंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असणाऱ्या युद्धाविषयी आपले मत मांडण्यासाठी असुदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विटर एक ट्विट पोस्ट केले आहे. त्यांनी, “गाझाचे हात, पॅलेस्टाईन जिंदाबाद.” असे म्हणत “हिंसा मुर्दाबाद” (मुख्यतः इस्रायल किंवा कोणत्याही गट/संस्थेद्वारे केली जाते) “मस्जिद ए अक्सा आबाद रहे” असे म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या युद्धाने जगाला हादरवलं आहे. या युद्धात गेल्या चार दिवसांमध्ये २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) सकाळी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली आणि युद्धाला सुरुवात केली. रॉकेट हल्ल्यापाठोपाठ हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो लोकांची गोळ्या घालून हत्या केली, तर १५० हून अधिक इस्रायली स्त्रियांचं अपहरण केले.