ऑनलाईन फसवणूकीला रोखण्यासाठी दिल्लीत हेल्पलाईन सुरू! लवकरच सर्व राज्यात सुरू होणार सुविधा!

ऑनलाईन बँकिंग सेवा जसजसे वाढू लागले आहेत, तसतशी भारतात फसवणूकही वेगाने होत आहे. दर दिवशी कुणी ना कुणी व्यक्ती ऑनलाईन फसवणूकीचा बळी ठरते. परंतु माहितीच्या अभावामुळे लोक आपल्याबरोबर वेळोवेळी झालेल्या फसवणूकीबद्दल तक्रार करू शकत नाहीत. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आणि लोकांचे पैसे वाचवण्यासाठी गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने हातमिळवणी केली. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे ज्यावर आपण त्वरित तक्रार करू शकता. चला तपशीलवार जाणून घेऊया

गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने 155260 वर एक हेल्पलाईन सुरू केली आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणूकीचा बळी पडल्यास, या नंबरवर त्वरित कॉल करा. आपल्या खात्यातून 7 ते 8 मिनिटांत ज्या आयडी वरून आपली रक्कम उडवली गेली असेल, हेल्पलाइन त्या संबंधित आयडीच्या बँकेला किंवा ई-साइटला चेतावणी संदेश पाठवेल. त्यानंतर ही रक्कम होल्ड केली जाईल.

ऑनलाईन फसवणूकीच्या घटना रोखण्यासाठी गृह मंत्रालयाच्या सायबर पोर्टल, https://cybercrime.gov.in/ आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचा 155260 पायलट प्रकल्प गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला होता परंतु आता तो पूर्णपणे सुरू करण्यात आला आहे. भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन एक व्यासपीठ आहे ज्याचा पहिला वापरकर्ता दिल्ली आहे. त्यात राजस्थानचीही भर पडली आहे. यानंतर, इतर सर्व राज्यात ही सुविधा सुरू केली जाणार आहे.

सुमारे 55 बँक, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवे आणि इतर संस्थांमध्ये ‘सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम’ नावाचे इंटरकनेक्ट प्लॅटफॉर्म आहे. या व्यासपीठाद्वारे ऑनलाइन आर्थिक फसवणूकीचा बळी ठरणाऱ्यांचा बचाव फारच कमी काळात होऊ शकतो. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आतापर्यंत 21 लोकांसाठी 3 लाख 13 हजार रुपयांची बचत करण्यात आली आहे.

या हेल्पलाईन क्रमांकाच्या दहा लाईन आहेत, जेणेकरून हा नंबर कधीही व्यस्त राहू नये. आपण 155260 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केल्यास आपणास नाव, क्रमांक आणि वेळ विचारली जाईल. मूलभूत माहिती घेतल्यास ती संबंधित बँकेच्या ई-कॉमर्सच्या संबंधित पोर्टल व डॅश बोर्डकडे पाठविली जाईल. तसेच पीडिताच्या बँकेलाही ही माहिती सामायिक केली जाईल. फसवणूकीनंतरचे 2 ते 3 तास फार महत्वाचे असतात. म्हणून शक्य तितक्या लवकर तक्रार करणे गरजेचे आहे. आपण https://cybercrime.gov.in/ वर देखील तक्रार करू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.