पिंपरी – भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून करोनासाठी असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर निश्चित केले आहेत. मात्र, काही प्रयोगशाळा जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांना पत्र पाठवून तंबी दिली आहे.
शहरातील मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांकडून शासन निर्णयानुसारच आकारणी करावी, असे बंधनकारक आहे.
खासगी प्रयोगशाळांना अधिक दर आकारता येणार नाहीत. तक्रारी आल्यास साथरोग अधिनियम, 1987 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिला आहे.