पुणे – कोणतीही चारचाकी रस्त्यावरून जाताना आपण त्या गाडीवरील लोगो पाहून चटकन ती कोणत्या कंपनीची आहे, हे ओळखतो. या गाड्यांचे वैविध्यपूर्ण लोगो त्या त्या कंपन्यांचे विचार आणि दृष्टिकोन दर्शवित असतात. या लोगोची प्रेरणा कोण, त्यामागच्या वेगवेगळ्या कहाण्या जाणून घ्यायला सर्वांना निश्चितच आवडेल.
1. बेंटली
1919 मध्ये ब्रिटीश शिल्पकार चार्ल्स साइक्सने, बेंटलीचे संस्थापक डब्ल्यू. ओ. यांच्यासाठी ‘फ्लाइंग बी’ हे शिल्प तयार केले. यानंतर, मालकांनी हे लोगो बदलणे सुरू ठेवले. परंतु 1930 नंतर, ‘फ्लाइंग बी’ हेच बेंटली कारचे मानक म्हणून स्वीकारले गेली. त्यानंतर ब्रिटीश चित्रकार गॉर्डन क्रॉस्बीने मूळ रचना बदलून पंख किंचित बदलले. 1930 च्या दशकात उंच झेप घेणारा चित्ता अर्थात जग्वारची संकल्पना अनेक हायस्पीड कारसाठी दिली होती, जी त्या काळात जगातील बर्याच मोटारींचा मॅस्कॉट आणि बॅज बनली होती. ‘स्प्रिंट ऑफ एक्स्टसी’ या रोल्स रॉयस कारच्या आयकॉनची रचना शिल्पकार साइक्स यांनीच केली.
2. रोल्स रॉयस
रोल्स रॉयसचा लोगो बनविण्यासाठी मुर्तीकार चार्ल्स सायक्सला जबाबदारी देण्यात आली होती. असे समजले जाते की, या कंपनीच्या कारच्या फ्रंट गिलवर दिसणारा स्पिरिट ऑफ एक्स्टसी अभिनेत्री एलेनर थॉर्नटनवर आधारित द व्हिस्परर नावाच्या मुर्तीकलेवर घेण्यात आला आहे. सायक्सला थॉर्नटनला आपल्या संग्रहात वापर करण्यास सांगण्यात आले होते.
3. फेरारी
इटालियन रेसकार ड्राइव्हर एनजो फेरारीला लढाऊ पायलट आणि जागतिक युद्धाचे नायक काउंट फ्रांसेस्को बाराकाला सन्मानित करण्यासाठी आपल्या वाहनावर एक घोड्याचे चित्र तयार करण्यास सांगितले होते. बाराकाने आपल्या विमानावर असेच एक घोड्याचे चित्र लावले होते. फेरारीने 1929 मध्ये स्केडिरिया फेरारी टीमची स्थापना केली व घोडा प्रतिक म्हणून ठेवले.
4. बुगाटी
बुगाटीचे संस्थापक अटोर बुगाटी यांनी 1909 मध्ये लाल ओव्हल बॅज विकसित केला. यात लाल रंग ताकद आणि उत्कटतेचे प्रतीक मानला जात असे. पांढरा रंग खानदानी आणि काळा धैर्याचा. 1926 च्या काही बुगाटी कारसाठी नाचणारे हत्तीही कांस्य शिल्पात घेतले गेले होते. बर्याच वेळा, कार कंपन्यांची परवानगी घेऊन इतरांनी चिन्हांचीही नक्कल केली. 1930 मध्ये अॅस्टन मार्टिनने बेंटलीच्या विंगचे अनुकरण केले. आता वॉगटन्स कंपनीने अॅस्टन मार्टिनच्या पंख असलेल्या डिझाईनचीही कॉपी केली आहे.
5. ऑडी
बरेचदा आपण चार रिंग चा लोगो असणारी गाडी पाहिली असेल, तसेच पाहिल्यावर आपल्याला माहीतच होते की ही ऑडी कार आहे. या कारसाठी चार वर्तुळासारख्या लोगो ठेवण्याच्या मागचे कारण असे आहे की, ऑडी ही कंपनी चार वेगवेगळ्या कंपन्यांना एकत्र करून बनलेली आहे, आणि त्या चार कंपनी ( ऑडी, हॉर्च, डीकेडब्ल्यू आणि वांडरर ) एकत्र आलेल्या असल्या मुळे त्या कंपनीच्या लोगो मध्ये चार वर्तुळे एकत्र आले आहेत हे दाखवले आहे.
6. बीएमडब्ल्यू
बवारीयन मोटर्स वर्क अर्थात बीएमडब्ल्यू ह्या कंपनीला विमानाचे इंजिन बनविण्यासाठी बनविले होते, या कंपनीच्या मालकांची पहिली कंपनी पहिल्या विश्वयुद्धामुळे बंद पडली होती, आणि त्या कंपनीचा मिळता जुळता लोगो बीएमडब्ल्यूसाठी घेण्यात आला होता. या लोगोमध्ये असणारा पांढरा भाग आणि निळा भाग हा त्यांच्या देशाच्या ध्वजाच्या रंगामधून घेण्यात आला आहे.
7. मर्सिडीज
अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मर्सिडीजचा सुरुवातीचा लोगो हा आताच्या लोगो सारखा नव्हता. 1909 मध्ये या जर्मन मोटारीची दोन लोगोला ट्रेडमार्क केले होते. ज्यात एका लोगोला तीन खांब होते व दुसऱ्यात चार खांब असलेला स्टार होता. मात्र त्याचा कधी उपयोग करण्यात आला नाही. सध्या दिसणाऱ्या स्टार सारख्या तीन पॉईंट्सचा अर्थ असा होतो कि पाणी, हवा, आणि जमीन ह्यांच्यावरील वर्चस्व अथवा दबदबा असल्याचे हा लोगो दर्शवतो.
8. लॅम्बोर्गिनी
लॅम्बोर्गिनी हि कंपनी सुरुवातीला ट्रॅक्टर्स बनवत होती, लॅम्बोर्गिनी च्या कंपनीचे मालिक फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांच्या नावावरून ह्या गाडीचे नाव लॅम्बोर्गिनी पडले. तसेच लॅम्बोर्गिनी चा लोगो हा त्यांच्या राशीवरून त्यांनी ठेवला होता, त्यांची वृषभ राश असल्याने त्यांनी त्यांच्या कंपनीचा लोगो हा त्यांच्या राशीला दर्शवणाऱ्या बैलाच्या चित्रात ठेवला. वृषभ म्हणजे बैल होते, तसेच त्यांना बैलांच्या मध्ये होणाऱ्या लढाया पाहणे आवडत असे.
9. टोयोटा
टोयोटा कंपनीची स्थापना 1937 मध्ये जपान येथे झाली होती. ह्या कंपनीच्या लोगोला आपण जर लक्ष पूर्वक पाहिले असता, आपल्याला दिसून येईल कि एका सुई मध्ये धागा टाकताना जी प्रतिमा तयार होते तसे चित्र समोर येईल. कारण टोयोटा ही सुरुवातीला धागे बनवणारी कंपनी होती, त्यामुळे त्यांच्या लोगोमध्ये अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते, सोबतच जर लोगोच्या प्रत्येक भागाला वेगळे केले तर टोयोटा कंपनीचे नाव ही आपल्याला बनताना दिसते.
1989 मध्ये कंपनीने 50व्या वर्षानिमित्त लोगो पुन्हा डिझाईन केला. यामध्ये तीन अंडाकार होते व ते एकमेंकाना भेदत होते. आतील दोन अंडाकार मिळून इंग्रजीतील T अक्षर तयार होते. कंपनीनुसार, या T मध्ये अंडाकार स्टेअरिंग व्हिलसोबतच ग्राहकांची अपेक्षा आणि कार निर्मितीच्या आदर्शाचे प्रतिक आहे. सर्वात बाहेरील अंडाकार टोयोटोची गळा भेट घेऊन जगाचे प्रतिनिधित्व करत आहे.
10. पोर्शे
पोर्शेचा लोगो शस्त्रांचे दोन कोट दर्शवतो. पहिले पश्चिम जर्मनीमधील वुर्टेंबर्गचे फ्री स्टेट आणि दुसरे त्याची आधीची राजधानी स्टटगार्ट.
11. ह्युंदाई
ह्युंदाई मोटर कंपनी ही दक्षिण कोरियाची एक कंपनी आहे. लोगोमध्ये कंपनीच्या सुरुवातीच्या नावाचा “H” आहे. परंतु नाही तसे नाही, त्या “H” सोबत आपण जर व्यवस्थित बघितले तर आपल्याला दिसून येईल की दोन व्यक्ती एकमेकांना हस्तांदोलन करताना दिसत आहेत, ज्यामध्ये ह्युंदाई कंपनी आपल्या ग्राहकाशी हस्तांदोलन करताना आपल्या प्रतिनिधी सोबत दाखवत आहे.
12. शेवर्ले
शेवर्ले आणि कंपनीचे सह-संस्थापक विलियम सी. ड्युरेंट यांनी कंपनीचा असा बो-टाय लोगो बनविण्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली याविषयी वेगवेळी मते आहे. त्यांच्या मुलीचे म्हणणे आहे की, त्यांनी सहजच हा लोगो तयार केला. तर दुसऱ्या माहितीनुसार, 1912 मध्ये वर्जिनियाच्या हॉट स्प्रिंग्समध्ये सुट्टीवर गेलेले ड्युरेंट आणि त्यांच्या पत्नी कॅथरिनने एका वृत्तपत्राच्या जाहिरातीमध्ये हा लोगो पाहिला व तेथून घेतला. अथवा त्यांचे भागिदार आणि स्विस कारचालक लुई शेवर्लेच्या जन्मस्थानाच्या सन्मानार्थ स्विर्झलँडच्या ध्वजाप्रमाणे दाखवण्यात आला आहे.
13. वोल्वो
वोल्वोचा लोगो रोमन देवता मंगळाचे प्रतिक असलेले शस्त्र आणि युद्धासोबत जोडलेला आहे आणि लोखंडासाठी किमयागाराचे प्रतिक देखील आहे. 1920 पासून कंपनी हा लोगो वापरत आहे.
14. मित्सुबिशी
तीन हिऱ्यांच्या या लोगोला कोण ओळखणार नाही? 1840 च्या दशकात हा लोगो तयार करण्यात आला. त्सुकुमो शोकाय कंपनीचे नंतर नाव बदलले मित्सुबिशी. ही नावे मित्सु (तीन) आणि हिशी (पाण्याचे चेस्टनट आणि डायमंड आकार) या जपानी शब्दांमधून देखील या लोगोचा अर्थ कळतो.