रेडा- इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची गरज ओळखून काम करणे हा माझा स्वभाव आहे. आजपर्यंत गोरगरिबांना केलेली मदत हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. कळंब (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आमदार भरणे यांनी पाच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. भरणे म्हणाले, आपण केलेल्या कामाचा गाजावाजा करणे आपल्या स्वभावात नसून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी पदाचा वापर होणे गरजेचे आहे. आयुष्यात सहजपणे केलेली मदत आपल्या कठीण प्रसंगी कामी येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपंग,वृध्द व सामान्य नागरिकांना जमेल ती मदत करणे गरजेची आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष वीरसिंह रणसिंग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे खजिनदार हनुमंत रणसिंग, छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भरणे यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, छत्रपतीचे चेअरमन प्रशांत काटे, संस्थेचे विश्वस्त शिवाजीराव रणवरे, प्रकाश कदम, नंदकुमार रणवरे, डॉ. एन. जी. रणवरे, योगेश डोंबाळे, उपसरपंच पांडुरंग पानसरे, संजय जाधव, रामभाऊ रणसिंग, पिंटू डोंबाळे, अनिल रूपनवर आदी उपस्थित होते. प्राचार्य अंकुश आहेर यांनी आभार मानले.