अवजड वाहतुकीने कोट्यवधींच्या रस्त्यांची लागली वाट

संबंधितांवर कारवाई करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

सणबूर – कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकीचा ढेबेवाडी-जिंती रस्ता अनेक ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अवजड वाहनांनी खराब केलेला आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

उमरकांचन हे गाव मराठवाडी धरणाचे पाणी पातळीमध्ये येत असल्याने त्यांच्यासाठी धरणालगत नवीन गावठाण निर्मितीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मराठवाडी धरणाचे भिंतीपासून जिंती गावचे हद्दीपर्यंत तीन ठिकाणी हे गावठाण विभागलेले आहे. या गावठाणच्या निर्मितीचे काम जलसंपदा विभाग करत असून याकामी बुलडोझर, पोकलॅंड यासारख्या अवजड यंत्रणेचा वापर केला जात आहे. परंतु एका गावठाणातून दुसऱ्या गावठाणात या वाहनांची वाहतूक करताना नुकताच नवीन तयार केलेला रस्ता खराब होईल याचा विचार न करता राजरोसपणे अवजड वाहनांची पक्‍या रस्त्यावरुन ने-आण केली जात असल्या कारणाने अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबर उखडलेले आहे.

जलसंपदा विभाग तयार करत असलेला मराठवाडी-जिंती रिंगरोड गेली चार वर्ष झाले तरी त्याचे मातीकाम त्यांना पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे आजही विभागातील लोकांना काही किलोमीटर खड्डयातून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर गतवर्षी आ. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून 3 कोटी 25 रुपये खर्चून नवीन पक्का रस्ता तयार केला. परंतु काही महिन्यांपासून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता जलसंपदा विभागाचे अवजड वाहनांनी ठिकठिकाणी उखडलेला आहे. मुळात अशा अवजड वाहनांची वाहतुक पक्‍या रस्त्यावरुन करु नये, असा नियम असताना त्याचे पालन केले जात नाही.

गावठाणात या वाहनांची वाहतुक करताना नुकताच नवीन तयार केलेला रस्ता खराब होईल, याचा विचार न करता राजरोसपणे अवजड वाहनांची पक्‍या रस्त्यावरुन ने-आण केली जात असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबर उखडलेले आहे. जलसंपदा विभाग तयार करत असलेला मराठवाडी-जिंती रिंगरोड गेली चार वर्ष झाली तरी त्याचे मातीकाम त्यांना पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे आजही विभागातील लोकांना काही किलोमीटर खड्डयातून प्रवास करावा लागत आहे.

अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर गेल्याच वर्षी आ. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून जवळपास 3 कोटी 25 रुपये खर्चून नवीन पक्का रस्ता तयार करण्यात आला आणि या विभागातील खराब रस्त्याचा वनवास संपवला. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे हा रस्ता अवजड वाहनांमुळे उखडला आहे. मुळात अशा अवजड वाहनांची वाहतूक पक्‍या रस्त्यावरून करू नये, असा नियम असताना त्याचे पालन होत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून संबंधित विभागावर कारवाई करावी, अशी मागणी विभागातील ग्रामस्थांनी केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.